पंचायतीच्या बैठकीच घुमला "जय महाराष्ट्र'' 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 24 मे 2017

आम्ही सीमाभागातील मराठी भाषिक "जय महाराष्ट्र'' म्हणणारच. यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही.

बेळगाव : आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठीच अनेक वर्ष झगडत आहे. तेव्हा आम्ही सीमाभागातील मराठी भाषक "जय महाराष्ट्र'' म्हणणारच. यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. असा आवाज बुधवारी (ता.24) झालेल्या तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य आप्पासाहेब किर्तने यांनी काढला.

कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्या विधानाला चांगलेच उत्तर दित. पदासाची अपेक्षा आम्हा मराठ्याना नसून आम्ही महाराष्ट्रात जाईस्तोपर्यंत गप्प बसणार नाही. असे खड्या आवाजात.

तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील आणि तालुका पंचायतीचे कार्यकरी अधिकारी ए. ए. हलसुडे यांना सांगितले. यावेळी सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. 

Web Title: belgaum news jai maharashtra slogans at panchayat meeting