काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेळगाव - काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत ४० जणांचा समावेश करण्यात आला आहे. या स्टार प्रचारकांच्या प्रचार दौऱ्याची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

बेळगाव - काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत ४० जणांचा समावेश करण्यात आला आहे. या स्टार प्रचारकांच्या प्रचार दौऱ्याची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांच्यासह कर्नाटक प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाबनबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ज्योतीरादित्य सिंधिया, के. एच. मुनियाप्पा, अभिनेते राज बब्बर, एस. आर. पाटील, दिनेश गुंडूराव, डी. के. शिवकुमार, शशी थरुर, बी. के. हरिप्रसाद, के. रहमान खान, आमदार सतीश जारकीहोळी, निवृत्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, प्रवक्‍त्या खुशबू, सी. एम. इब्राहिम, एम. एच. अंबरिश, अभिनेत्री रम्या, एच. के. पाटील, आर. व्ही. देशपांडे, रामलिंग रेड्डी, एम. बी. पाटील, रोशन बेग, एच. सी. महादेवप्पा, मुख्यमंत्री चंद्रू यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट आहे.

अभिनेते, राष्ट्रीय नेते, क्रिकेटपटू, माजी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री मिळून ४० जणांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. स्टार प्रचारकांच्या दौऱ्याची तारीख अजून निश्‍चित नसली तरी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सिध्दरामय्य यांनी दौरा काढून बेळगाव जिल्ह्यात ६ ठिकाणी सभा घेतल्या आहेत. अन्य प्रचारकांच्या दौऱ्याची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसतर्फे देण्यात आली.

Web Title: Belgaum News Karanatak Assembly Election