कर्नाटक विधानसभेसाठी "कजप'ची यादी जाहीर

संजय सूर्यवंशी
बुधवार, 28 मार्च 2018

बेळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटक जनता पक्षातर्फे (कजप) 43 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती कर्नाटक जनता पक्षाचे राज्याध्यक्ष पद्मनाभ प्रसन्न यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

बेळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटक जनता पक्षातर्फे (कजप) 43 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती कर्नाटक जनता पक्षाचे राज्याध्यक्ष पद्मनाभ प्रसन्न यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

भाजपशी फारकत घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 2013 साली कजपच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, यानंतर त्यांचे पुन्हा भाजपशी संधान जुळल्याने ते पुन्हा भाजपवाशी झाले. कर्नाटक जनता पक्षातील उमेदवार सोईनुसार भाजप व अन्य पक्षात दाखल झाले. त्यानंतर कजपची चर्चा नव्हती. विधानसभा निवडणुकीत परत कजपच्या चर्चेला सुरवात झाली आहे. पक्षाने उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. राज्यात 43 जागांवर उमेदवार उतरविले जातील, अशी माहिती प्रसन्न यांनी दिली. 

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी भोपाल अत्तू, बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून संतोष दुंडाप्पा पद्मण्णवर, रायबाग विधानसभा मतदार संघातून अनंतकुमार ब्याकूड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, मी स्वतः बंगळूर यशवंतपूर आणि बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविणार असल्याचे पद्मनाभ प्रसन्न यांनी स्पष्ट केले. 25 ते 30 जागांवर उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष एच. एम. हणमंतप्पा, संतोष पद्मण्णवर, इरण्णा झेंडू, सुधीर के. संभाजी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Karnataka assembly election