कर्नाटकात काँग्रेसच्या प्रचाराला समरसतेचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

निपाणी - जनता दल, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांचे १९९० पासून दोलायमान ठरलेले राज्यातील अस्तित्व स्थिर करण्यास गेल्या पाच वर्षांत काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी यशस्वी प्रयत्न केले. २००८ ते २०१३ पर्यंत राज्याला तीन मुख्यमंत्री देणाऱ्या भाजपला स्थिर व आश्‍वासक शासन देता आले नाही. परंतु गेल्या पाच वर्षात सिद्धरामय्या सरकारने सर्व जाती-धर्मात व विशेषतः तळागाळात लोकप्रियता मिळविली. 

राज्यात सामाजिक सत्ता समीकरण घडविताना पारंपरिक वक्कलिग आणि लिंगायत या प्रभावी समाजातील अन्य बहुजनांना वाटून घेण्याच्या स्पर्धेच्या स्वरूपाला सिद्धरामय्यांनी वेगळे आणि समरसतेचे स्वरूप दिले. बळ्ळारी, चित्रदुर्ग, म्हैसूर, रायचूर, कोलार, दावणगेरी व बेळगाव या सात जिल्ह्यात अनुसूचित जमातीची ५४ टक्के मतदार संख्या आहे. तर १३ टक्के मुस्लीम समाज आहे. हे समाजगट यापूर्वी वक्कलिग व लिंगायत यामध्ये विभागले होते.

इतर मागास, दलित व अल्पसंख्य यांच्या बांधणीबरोबर राज्यावर नियंत्रण ठेवण्यास सिद्धरामय्या यशस्वी ठरले आहेत. त्या सर्व समूहांचा पाठिंबा मिळविण्यात व या वेळी सर्व समाज घटकांना समतोल उमेदवारी देण्यात ते यशस्वीही ठरले. २०१३ च्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या ३६.०६ टक्के मतांच्या आधारावर ५४.२६ टक्के जागा जिंकून सत्ता मिळविली.

२०१३ चा कर्नाटक विधानसभेचा निकाल
पक्ष    लढविलेल्या जागा    जिंकलेल्या जागा
काँग्रेस    २२३    १२१
भाजप    २२२    ४०
केजेपी    १९७    ०६
धजद    २२२    ४०
बीआरए (काँग्रेस)    १७५    ०४
समाजवादी    २७    ०१
केएमपी    ०७    ०१
एसकेपी    ०६    ०१
अपक्ष    १,२१७    ०९
 
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election