देशाचे संविधान बदलल्यास रक्तक्रांती - मल्लिकार्जुन खर्गे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

रायबाग - देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास देशात रक्तक्रांती होण्यास विलंब लागणार नाही. देशाचे संविधान वाचविण्यासाठी कर्नाटकातील ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 
व्यक्त केले. 

ते बेळगाव जिल्ह्यातील कुडची मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अमित घाटगे यांच्या प्रचारार्थ हारूगेरीत आयोजित सभेत बोलत होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद म्हणाले, ‘राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या १६५ आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. जातीभेद न करता विविध कामे राबविली आहेत. अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार अमित घाटगे यांना विजयी करावे,’

महेश तमण्णावर, संजीव बाणे, सुरेश ऐहोळे, शंकर पुजारी, बाबाजान इस्माईल, एल. एस. चौगुला, पारिसा उगारे, महेश कोरवी, राजू शिरगावे, भीमन्ना बनशंकरी, विठ्ठल हळ्ळूर, कलावती नडोणी, दस्तगीर कागवाडे, गिरीश दरुर, साहेबलाल रोहिले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election