नरेंद्र मोदी फेकू पंतप्रधान - गुलाम नबी आझाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, ‘मागील ८ ते १० दिवसांपासून कर्नाटक दौऱ्यावर आहे. काँग्रेस पक्षाची स्वबळावर सत्ता येईल, असा विश्‍वास आहे. जनतेत भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. काळा पैसा परत आणण्याची आश्‍वासने मोदी यांनी दिली होती. त्यासाठी बचतखाते उघडण्यासाठी सूचना करून त्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण, दुर्दैवाने पैसे जमा झाले नाहीत. अनेकांनी खाती बंद केली आहेत. महागाईचा आलेख वाढला आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ३५० रुपयांना मिळणारे सिलिंडर आज ८०० रुपये झाले आहे. १० कोटी युवकांना रोजगार देण्याची आश्‍वासने मोदी यांनी दिली होती. चार वर्षात केवळ ३.५ लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. पीक कर्ज माफीला केंद्राकडून नकार मिळतो आहे.’

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना केंद्राने सुरु केली. पण, गेल्या २ ते ३ वर्षात अल्पवयीन मुली व महिला असुरक्षित झाल्या आहेत. अत्याचार, बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. ५ ते १७ वयोगटातील मुलींवर अत्याचार वाढले आहेत. काही घटनांत भाजप नेत्यांचा हात आहे, ही शरमेची बाब आहे. 

कर्नाटक निवडणुकीत मोदी यांनी शहर रेल्वे विकास योजनेसाठी १७ हजार कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात त्यांनी काहीच दिलेले नाही. स्मार्टसिटी योजनेबाबत अशीच धूळफेक केली जात आहे, अशी माहिती श्री. आझाद यांनी दिली.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election