उमेश कत्ती आठव्यांदा आमदार 

आनंद शिंदे 
मंगळवार, 15 मे 2018

हुक्केरी मतदार संघ 

हुक्केरी - हुक्केरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेश कत्ती व कॉंग्रेसचे ए. बी. पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये दोन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेऊनही अखेरच्या टप्प्यात भाजपाच्या उमेश कत्ती यांनी मुसंडी मारुन विजयाचा झेंडा लावला आहे. ए. बी. पाटील हे प्रचारात बरेच मागे राहिले.

हुक्केरी - हुक्केरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेश कत्ती व कॉंग्रेसचे ए. बी. पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये दोन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेऊनही अखेरच्या टप्प्यात भाजपाच्या उमेश कत्ती यांनी मुसंडी मारुन विजयाचा झेंडा लावला आहे. ए. बी. पाटील हे प्रचारात बरेच मागे राहिले. पण भाजपाचे उमेदवार उमेश कत्ती हे कॉंग्रेसची पारंपरिक व्होट बॅंक फोडण्यात यशस्वी ठरले. त्यामुळेच त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. परिणामी पुन्हा एकदा कमळ फुलून आमदार उमेश कत्ती यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

आतापर्यंत आठवेळा विजयी होऊन उमेश कत्ती राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम केले आहे. आतापर्यंत 9 वेळा निवडणूक लढवून 8 वेळा विजयी झाले आहेत. तर माजी मंत्री शशिकांत नाईक यांच्याकडून एकदा निसटता पराभव झाला आहे. त्यांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम, कारागृह, कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवार ए. बी. पाटील यांचा गेल्या दहा वर्षात मतदार संघात संपर्क नव्हता.

राजकीय संपर्कही खूपच कमी झाला होता. मात्र त्यांनी या निवडणुकीत दिलेली झुंज लक्ष्यवेधी ठरली. त्यामध्ये अटीतटीची लढत निश्‍चित धरूनच प्रचाराचा सपाटा दोन्ही पक्षांनी लावला होता. कॉंग्रेसला कत्ती बंधूंच्या विरोधात या मतदार संघात विजयाचा मार्ग सोपा नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. पुन्हा एकदा उमेश कत्तींनी आपले वर्चस्व सिद्ध करून या मतदार संघावर आपली जरब असल्याचे दाखवून दिले आहे. 
 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election