धजद, कॉंग्रेसचे आमदार रिसॉर्टमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बेळगाव - भाजपच्या "ऑपरेशन कमळ' पासून वाचण्यासाठी धजद आणि कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ता स्थापनेपर्यंत कॉंग्रेस आणि धजदने आपल्या आमदारांना राज्याबाहेरील रिसॉर्टवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या दोन्ही पक्षांना "ऑपरेशन कमळ'ची भीती आहे. कॉंग्रेसने खासगी रिसॉर्टमध्ये आमदारांची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे. 

2008 च्या निकालानंतर बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात "ऑपरेशन कमळ' राबविण्यात आले होते. कॉंग्रेस आणि धजदमधील आमदारांना याद्वारे भाजपमध्ये खेचण्यात येडियुराप्पा यशस्वी ठरले होते. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्यांना भाजपमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. आता पुन्हा राज्यात त्रिशंकु स्थिती असल्याने कॉंग्रेस आणि धजदने आतापासूनच काळजी घेतली असून रिसॉर्टवर आमदारांना ठेवले आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कॉंग्रेस आणि धजदने आपल्या आमदारांना बंगळूरला बोलावणे धाडले होते. बुधवारी (ता. 16) सकाळी आठ वाजता कॉंग्रेस आमदारांची बैठक झाल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांना खासगी रिसॉर्टवर पाठविण्यात आले. 

भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांची मंगळवारी (ता. 15) भेट घेतली. तर कॉंग्रेसनेही धजदला बिनशर्त पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे सत्ता स्थापनेनंतर येडियुराप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अशा वेळेस कॉंग्रेस आणि धजदमधील आमदार फुटल्यास भाजपला ते सोयीस्कर ठरू शकते. यासाठी सध्या दोन्ही पक्षांना दक्षता घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून बहुमत सिद्ध होईपर्यंत दोन्ही पक्षाचे आमदार रिसॉर्टवर एकत्रित राहणार आहेत. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election