जारकीहोळी समर्थकांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

बेळगाव -  माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी ते आंदोलनातून व्यक्त करत आहेत.

बेळगाव -  माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी ते आंदोलनातून व्यक्त करत आहेत.

आज संतप्त झालेल्या जारकीहोळी यांच्या समर्थकांनी येथील क्लब रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यालयावरील बॅनर्स फाडण्यात आले. कार्यालयासमोरील कुंड्या फोडण्यात आल्या. कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही. जारकीहोळी समर्थकांनी काल बंगळूर व बेळगावात आंदोलन केले होते.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Politics