कोरेगाव भीमा दंगलविरोधात बेळगावात निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

संघटना आक्रमक; टायर पेटवून निधेष

बेळगावः भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या घटनेच्या विरोधात दलित संघटनांनी आज (बुधवार) बेळगावात जोरदार निदर्शने केली. चन्नम्मा चौकात टायर पेटवून निदर्शने केली. चन्नम्मा चौकामध्ये मानवी साखळी करून निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निषेधही नोंदविला.

कोरेगाव भीमा येथे समाजकंटकांनी दंगल घडविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आज (ता. 3) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. न्यायालयीन चौकशी करण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे. त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले. बेळगावात दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. समाजकंटकांनी घडविलेल्या दंगलीचा निधेष नोंदविला आहे. बेळगावात आंबेडकर उद्यानात जमले आणि येथून चन्नम्मा चौकात आले. त्याठिकाणी मानवी साखळी करून निधेष नोंदविला. टायर पेटवून निषेध नोंदविला.

केंद्र, महाराष्ट्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे चौकात वाहतूक बंद होती. चारी बाजूने वाहनांची रांग लागली होती. सुमारे अर्धा तास आंदोलन केले. येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निधेष नोंदवत दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांना निवेदन दिले. व्यापक पोलिस बंदोबस्त मोर्चानिमित्त तैनात करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, पोलिस सहाय्यक उपायुक्त शंकर मारीहाळ आणि पोलिसन निरीक्षक प्रशांत यांच्यासह सहाय्यक पोलिस उपस्थित होते.

Web Title: belgaum news koregaon bhima and belgaum demonstrations