बेळगाव महापालिका स्थायी समितीवर मराठी गटाचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांची सत्ता मराठी गटाला मिळाली आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर निवडणूक अधिकारी होते. आरोग्य, महसूल, लेखा व बांधकाम या चार स्थायी समित्यांची निवडणूक सोमवारी झाली.

आधी निश्चित केल्याप्रमाणे सत्ताधारी गटाकडून चार स्थायी समित्यांसाठी 16 जणांनी तर विरोधी गटाकडून 12 जणानी अर्ज दाखल केले. प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात सदस्य असतात. सत्ताधारी व विरोधी गटात झालेल्या सामंजस्यानुसार नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. प्रत्येक स्थायी समितीमध्ये सत्ताधारी गटाच्या चार तर विरोधी गटाच्या तीन नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे चारही स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी मेघण्णावर यानी जाहीर केले.

या स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक आता महापौर बसवराज चिक्कलदिन्नी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत होईल. अध्यक्ष निवडीची तारीख महापौरांकडून जाहीर केली जाईल. मराठी नगरसेवकांमध्ये मतभेद झाल्यामुळे तीन स्थायी समित्यांवरील सत्ता गमवावी लागली होती. यंदा मराठी नगरसेवकांनी मतभेद टाळले व चारही स्थायी समित्यांची सत्ता मिळवली.

Web Title: Belgaum News Marathi group dominates the Standing Committee