एमबीए पेपरफुटीची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

बेळगाव - एमबीए पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या प्रश्‍नपत्रिका फुटी प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिला आहे. फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेत बिजनेस डाटा ॲनालिसिस, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट, मॅनेजरियल इकॉनॉमिक्‍स या तीन विषयांची प्रश्‍नपत्रिका फुटली होती. तिन्ही विषयांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला आहे. ‘अभाविप’ने विरोध केल्यानंतरही फेरपरीक्षेच्या निर्णयावर ठाम आहे.

एमबीए परीक्षेतील वरील तीन विषयांच्या प्रश्‍नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मते एका विषयाची प्रश्‍नपत्रिका तर बेळगावातीलच एका खासगी व्यवस्थापन महाविद्यालयाकडून जशीच्या तशी घेण्यात आली होती. चौकशीसाठी कुलगुरू शिवानंद होसमनी चौकशी समिती स्थापन करणार आहेत. विद्यापीठाच्या सिंडिकेट सदस्यांनी परीक्षा विभागप्रमुखांवर कारवाई करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे; पण त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. फेरपरीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे काही विद्यार्थी व प्राध्यापकांचे मत आहे.

पहिल्या व तिसऱ्या सत्रातील विद्यार्थी आता दुसऱ्या व चौथ्या सत्रातील परीक्षांची तयारी करत आहेत. अशा स्थितीत त्यांना पुन्हा परीक्षेची तयारी करण्यास सांगणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्‍स देण्याचा पर्याय आहे; पण ३० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ग्रेस मार्क्‍स देता येत नाहीत. ६० टक्के प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, अशी तक्रार असल्याने विद्यार्थ्यांनी केवळ ४० गुणांची प्रश्‍नपत्रिका सोडविली आहे. ३५ पेक्षा कमी गुण मिळाले तर तांत्रिक समस्या उद्‌भवण्याची भीती आहे. त्यामुळेच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

Web Title: Belgaum News MBA paper leak issue