कर्नाटकात आमदारांची कसरत मंत्रिपदासाठी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

बंगळूर - काँग्रेस-धजद युती सरकारने शुक्रवारी बहुमत सिध्द केल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी आमदारांची जोरदार कसरत सुरू झाली आहे. रिसॉर्टमधून परत आल्यानंतर घरी न जाता बहुसंख्य आमदारांनी दिल्ली गाठली आहे.

काँग्रेस-धजद युतीत संख्येच्या आधारे काँग्रेसला २२ मंत्रीपदे व धजदला १२ मंत्रीपदे मिळणार आहेत. धजदपेक्षाही काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेस श्रेष्ठी मंत्रिपदाची वाटणी जातवार करण्यात मग्न आहेत. ब्राम्हण समाजाचे रमेश कुमार यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समाजातील दिनेश गुंडूराव किंवा आर. व्ही. देशपांडे या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेस पक्षात कुरुबर समाजाचे ९ आमदार आहेत. त्यांना किमान दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्‍यता आहे. लिंगायत समाजातील २ किंवा ३ वक्कलिग समाजातील २, महिला विभागातून एकाला मंत्रिपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारपर्यंत मंत्रिमंडळाची निवड प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

अपक्षांनाही हवे मंत्रिपद
अपक्ष आमदारसुध्दा मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. त्यामुळे अपक्ष आमदार शिवानंद पाटील व राजशेखर पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Belgaum News MLA exercises for the minister