पेजावरस्वामी यांची मोदी सरकारवर नाराजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

बंगळूर - विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य असलेले उडपी येथील पेजावर मठाचे विश्वेश्वरतीर्थ स्वामींनी भाजपविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून अपेक्षित काम झाले नसल्याचा त्यांनी आरोप केला.

पेजावर स्वामी आजवर भाजप व आरएसएस संघाचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. आता त्यांच्या धोरणात का बदल झाला, असा प्रश्न त्यांच्या भक्तांनाही पडला आहे. गेल्या चार वर्षांत केंद्राकडून अपेक्षित पातळीवर काम झाले नाही, असे मत व्यक्त करून गंगा नदीचेही शुद्धीकरण केले नसल्याचा त्यांनी आरोप केला.

उडपी येथे बोलताना स्वामी म्हणाले, राजकारणी लोक रिसॉर्ट, ऑपरेशनमध्ये तल्लीन झाले आहेत. विरोधी पक्षमुक्त सरकार योग्य नाही. विरोधी पक्ष राहीला पाहिजे हा माझा दावा आहे. असे सांगून भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या धोरणाला त्यांनी न कळत विरोध दर्शविला आहे. कट्टर हिंदुवादी धोरण असलेल्या पेजावर स्वामींनी, श्रीकृष्ण मठाच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन केले. मध्व परंपरेत त्यांनी नव्या संप्रदायाची नांदी सुरू केली. स्वामींच्या या उपक्रमाचे काही नेते व संघटनांनी स्वागत केले आहे.

Web Title: Belgaum News Pajavarswari disfavour