बेळगाव महापाैरांच्या निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त

 मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

बेळगाव - कन्नड संघटनांकडून हल्ल्याच्या शक्यतेने बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या निवासस्थानासमोर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगाव - कन्नड संघटनांकडून हल्ल्याच्या शक्यतेने बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या निवासस्थानासमोर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महापौर बांदेकर बुधवारी बेळगावात निघालेल्या काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्या होत्या. त्याला कन्नड संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कन्नड संघटनांकडून महापौरांच्या निवासस्थानावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बेळगाव महापालिका कार्यालयाच्या समोरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका कार्यालयातील महापौरांच्या कक्षावर हल्ला होण्याच्या शक्यतेने ही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षी तात्कालिन महापौर सरीता पाटील यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभाग घेतल्यावर महापौर कक्षावर हल्ला झाला होता.

Web Title: Belgaum News Police Protection to Mayor