काश्‍मीरमधील तणावाला कॉंग्रेस नेत्यांचीच फूस

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

राज्यवर्धन राठोड ः देशाची सुरक्षाव्यवस्था भक्कम

चिक्कोडी: भारतीय सीमेवरील जनता आणि भारतीय लष्करात द्वेष भावना निर्माण करण्याचे काम पाकिस्तान करत असून, त्याला जम्मू-काश्‍मीरमधील कॉंग्रेस नेत्यांचीही मदत होत असल्याची घणाघाती टीका केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केली. केंद्राने भारतीय सैन्याला शत्रूराष्ट्रात घुसून मारण्याइतपत स्वातंत्र्य दिले असून, देशाची सुरक्षा व अर्थव्यवस्था भक्कम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे आज "केएलई' संस्थेत आयोजित "सबका साथ सबका विकास' मेळाव्याच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे होते.

राठोड म्हणाले, ""गेल्या 70 वर्षांपासून नेहमी तोडफोडीचे राजकारण करून विरोधकांनी केवळ सत्ता उपभोगली. आता प्रत्येकाने आपल्या घराप्रमाणे देशाच्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपण परिवारासाठी जोडलेल्या मित्रांप्रमाणे लोकप्रतिनिधी दिल्याने केंद्रातील नेतृत्व प्रामाणिकपणे कठोर निर्णय घेत आहे. तीन वर्षांत 14 हजार गावांना वीज देण्यात आली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात निर्माण झालेल्या रस्त्यांचा नरेंद्र मोदींच्या काळात विस्तार होत आहे. बेरोजगारी निवारणासाठी नऊ हजार कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.''

Web Title: belgaum news rajyavardhan singh rathore and congress