आनंद अप्पुगोळच्या बंगल्यातून 41 लाखांची वाहने जप्त

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 1 जून 2018

बेळगाव - हनुमाननगर येथील आनंद अप्पुगोळ यांच्या बंगल्याच्या परिसरात लावलेली 33 वाहने आज पोलिसांनी जप्त केली. यामध्ये तीन मोटारी व तीस दुचाकी वाहनांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मोटारींमध्ये फॉर्च्यूनर, इनोवा व क्वालिस या मोटारी आहेत. या सर्व मोटारींची किंमत 41 लाख 35 हजार रुपये होते.

संगोळ्ळी रायन्ना मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील 232 कोटीच्या ठेवी अद्याप ठेवीदारांना परत दिलेल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी (ता. 31 मे )शेकडो ठेवीदारांनी हनुमाननगर येथील अप्पुगोळ यांच्या बंगल्यासमोर जमून निदर्शने केली. यानंतर पोलीस खात्याला जाग आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या संगोळ्ळी रायन्ना सोसायटीवरील कारवाईला पोलिसांनी आज पुन्हा प्रारंभ केला.

गुरुवारी अप्पुगोळ यांच्या बंगल्यासमोर जेव्हा ठेवीदार जमले होते, तेव्हा पोलिस अधिकारीही मोठ्या संख्येने होते. यावेळी बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात वाहने थांबल्याचे लक्षात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार अप्पूगोळ यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज सकाळी पोलिसांनी त्यांच्या  जवळील वाहने ताब्यात घेतली. यामध्ये ३३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारी व सात लाख 85 हजार रुपये किमतीच्या तीस दुचाकींचा समावेश आहे.  ही सर्व वाहने जप्त करून आज  पोलीस आयुक्तालयाच्या पटांगणात आणून लावण्यात आली. जप्त केलेल्या मोटारींमध्ये किंमती फॉर्च्यूनरचाही समावेश आहे. ही सर्व वाहने ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केल्याचा संशय पोलिसांना असल्याने ती जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Belgaum News Sangoli Rayanna Society Fraud