शहापुरला वृद्धेची गळफासाने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

बेळगाव - वृद्धेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास शहापूर येथे उघडकीस आली. लक्ष्मीबाई वसंत शिरोडकर (वय 82, रा. सरस्वती रोड, भारतनगर शहापूर) असे मृत वृद्धेचे नाव आहे.  आजारपणामुळे मानसिक अस्वास्थ्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मीबाई या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांना कॅन्सर तसेच रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक तणावाखाली वावरत होत्या. रविवारी (ता. 22) रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण करून झोपी गेले. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मुलगा आईच्या खोलीतील लाईट सुरू असल्याचे पाहून दरवाजा ढकलला. यावेळी लक्ष्मीबाई यांनी पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही माहिती त्यांनी तातडीने शहापूर पोलिसांना कळविली. पोलीस उपनिरीक्षक बी के नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांचा मुलगा दीपक शिरोडकर यांनी याबाबतची फिर्याद दिली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागरात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोन वाजता शहापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Belgaum News suicide incidence in Shahapur