कर्नाटकात खातेवाटपावरून दोन मंत्री नाराज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

बंगळूर - मंत्री जी. टी. देवेगौडा व सी. एस. पुट्टराजू यांनी आपणास मिळालेल्या खात्यांवरून नाराजी व्यक्त केली असून खाते बदलून देण्याची मागणी केली आहे.

बंगळूर - मंत्री जी. टी. देवेगौडा व सी. एस. पुट्टराजू यांनी आपणास मिळालेल्या खात्यांवरून नाराजी व्यक्त केली असून खाते बदलून देण्याची मागणी केली आहे.

उच्च शिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा म्हणाले, ‘मला वाहतूक किंवा महसूल खाते मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मला उच्च शिक्षण खाते दिले. पण, मला लोकांशी थेट संपर्क येणारे खाते मिळेल, असे वाटत होते. 

त्यामुळे आपण नाराज आहे.’ लघु पाटबंधारे मंत्री सी. एस. पुट्टराजू यांनीही आपल्या खात्याबद्दल असमाधान व्यक्त करून वाहतूक खाते देण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, ‘खाते वाटपावरून काही मंत्री असंतुष्ट असल्याचे मी प्रसारमाध्यमातूनच ऐकले. याबाबत माझ्याकडे कोणीच प्रत्यक्ष तक्रार केलेली नाही. प्रत्येक खात्यात समर्थपणे काम करण्याची संधी असते. प्रत्येकाने आपापल्या खात्यात प्रगती करून दाखवावी.’

Web Title: Belgaum News two minister angry on department allocation