गोव्याला जातो असे सांगून गेलेला बेळगावचा तरुण बेपत्ता

अमृत वेताळ
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

बेळगाव - कामानिमित्त गोव्याला जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. 23) बेपत्ता तरुणाच्या आईने कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. समीर मेहबुब बालदार (वय 24, रा. हायस्ट्रीट कॅम्प) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, समीर हा सोमवारी (ता. 4) दुपारी दीडच्या सुमारास कामानिमित्त गोव्याला जाऊन येतो, असा निरोप घरी देऊन तो निघून गेला होता. आठ दहा दिवस काम असल्याने ते उरकून येतो, असे त्याने सांगितले होते. मात्र, अद्यापर्यंत तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे समीरची आई विकारुत्नीसा यांनी शनिवारी (ता. 23) कॅम्प पोलीस ठाणे गाठून आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुण बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. त्याला हिंदी, इंग्रजी, उर्दु आणि मराठी भाषा अवगत आहे. या वर्णनातील तरुणाबद्दल कोणाला माहिती असल्यास त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याशी 08312405234 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum youngster missing