बेळगावमध्ये महामार्गावर धावत्या ट्रकला आग

संजय सूर्यवंशी 
सोमवार, 26 मार्च 2018

बेळगाव - महामार्गावरून निघालेल्या ट्रकला अचानक आग लागली. इंजिनमध्ये बिघाड होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनाच्या डिझेल टँकला व टायरींना याची झळ बसली पण स्फोट होण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राष्ट्रीय महामार्गावरील  भूतरामहट्टीजवळ आज सकाळी ही घटना घडली.जेसीबी घेऊन ट्रक कोल्हापूरहून बंगळूरकडे निघाला होता. ट्रक भूतरामहट्टीजवळ पोचला तेव्हा इंजिनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. आधी किरकोळ वाटणारी ही आग इंधनाच्या टाकीकडे जाऊ लागली. त्यानंतर टायरना झळ बसून ते पेटले. परंतु येथे अग्निशामक दलाचे वाहन तातडीने  पोहोचल्याने पुढचा अनर्थ टळला. या आगीची झळ ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या जेसीबीलाही बसली आहे.

महामार्गावरच ट्रकने पेट घेतल्याने पाठीमागून येणारी वाहने थांबली होती. त्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Belgum News truck fire incidence on highway