आमदारांच्या बंडखोरीने ममतादिदी चिंतेत;दोन दिवसांत चार नेत्यांचे राजीनामे 

mamata-banerjee
mamata-banerjee

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षा (टीएमसी) पुढील अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे. पक्षातील चार आमदारांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन दिवसांत मोठे झटके बसले आहेत. ‘तृणमूल’चे आमदार शीलभद्र दत्त आणि अल्पसंख्याक गटाचे नेता कबीर उल इस्लाम यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. या आधी सुवेंदू अधिकारी आणि जितेंद्र तिवारी हेही ‘टीएमसी’तून बाहेर पडले आहेत. 

शीलभद्र दत्त हे २४ परगणा जिल्ह्यातील बराकपूर मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठविला आहे. भारतीय राजकारण कृती समितीचे (आय- पॅक) प्रमुख प्रशांत भूषण यांच्याबाबत दत्त यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराची सर्व सूत्रे प्रशांत किशोर यांच्याकडे असून ममता बॅनर्जी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर किशोर यांच्याकडे पक्षाची राजकीय रणनीती निश्‍चित करण्याचे काम सोपविले होते. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींत ढवळाढवळ करण्यास दत्त यांचा तीव्र विरोध होता. `प्रशांत किशोर यांचे काम मार्केटिंग कंपनीसारखे आहे. अशा वातावरणात काम होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

डोकेदुखी वाढली 
ममता बॅनर्जी यांचे विश्‍वासू मानले जात असलेले सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ‘तृणमूल’मध्ये राजीनामासत्रच सुरू झाले आहे. पांडेश्‍वर मतदारसंघाचे आमदार जितेंद्र तिवारी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कोलकत्यासाठी मुबलक निधी उपलब्ध केला जात असताना आसनसोलच्या विकासासाठी पैसे मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर आता आमदार शीलभद्र दत्त आणि अल्पसंख्याक गटाचे नेता कबीर उल इस्लाम यांनी आज राजीनामा दिला आहे. पक्षातील बंडखोरी ममता बॅनर्जी यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com