बंगालमधील 107 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

- काँग्रेससह इतर पक्षांतील आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश.

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 107 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आमच्याकडे त्यांच्या नावांची यादी तयार असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी तृणमुल काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आहे. आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून, अनेक तृणमुलमधील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नुकतेच काही आमदार व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता, चक्क भाजपमध्ये 107 आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा मुकुल रॉय यांनी केला आहे.

मुकुल रॉय यांचा भाजपचा पश्चिम बंगालमधील विजयाचा मोलाचा वाटा होता. तृणमुल काँग्रेसमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण, 2017 मध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengals 107 MLA will Join BJP Party