बंगळुरूमध्ये दोन वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या

Bengaluru crime news
Bengaluru crime newsesakal
Summary

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

बंगळुरूमधून (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं दोन वर्षांच्या मुलीचा तिच्या 31 वर्षीय काकानं कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केलीय. अटीबेले (Attibele) येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षांच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय.

रविवारी 20 मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी करण्यासाठी भाचीला त्याच्या घरातून घेऊन गेला होता. यावेळी त्यानं आपल्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तेव्हा त्यानं तिला जोरात थप्पड मारली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. दरम्यान, 31 वर्षीय आरोपीनं गुन्हा केल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेलं. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलंय.

Bengaluru crime news
योगींच्या शपथविधीपूर्वीच लखनऊमध्ये चकमक; दरोडेखोर ठार

त्यानंतर पोलिसांनी (Police) संशयिताची चौकशी सुरु केली. कारच्या सीटवरून पडल्यानं अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी आरोपीनं ब्रेक लावल्यामुळं खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली, असा अंदाज पोलिसांनी बांधलाय. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला तत्काळ अटक करण्यात आलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com