
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये सततच्या पावसामुळे तेथील सामान्य लोकांचे जीवनच विस्कळीत झाले नाही तर रस्त्यावर चालणे देखील एक समस्या बनली आहे. रविवार ते सोमवार या कालावधीत, फक्त २४ तासांत, १०५.५ मिमी पाऊस पडला आहे. जो २०११ नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे. अशा परिस्थितीत बेंगळुरू सेंट्रलचे भाजप खासदार पीसी मोहन यांनी आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम देण्याचा विचार करण्यास सांगितले.