

Bengaluru Fake Cancer Medicine Racket Exposed
esakal
बेंगळुरू पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि औषध नियंत्रण विभागाने संयुक्त कारवाई करत कॅन्सरसह गंभीर आजारांवरील बनावट औषधांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून शहरातील ९० हून अधिक रुग्णालये आणि दवाखान्यांना बनावट किंवा पुनर्पॅकेज केलेली औषधे पुरवली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.