
Public Horror Woman Murdered by Husband at Bus Stand
Esakal
बंगळुरूत पतीने पत्नीची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या केलीय. बस स्टँडवरच लेकीसमोर पतीने ११ वार केले. दोघांचंही ३ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. सोमवारी सकाळी सुनकादकट्टे बस स्थानकात ही घटना घडली. रेखा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रेखाच्या मुलीच्या डोळ्यासमोरच लोहिताश्वने ही हत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.