
शाळेत बायबल वाचण्याची सक्ती? हिजाबनंतर आता कर्नाटकात नवा वाद
कर्नाटकात शाळेत हिजाब घालण्यावरून झालेल्या वादानंतर आता ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ बायबल यावरून नवा वाद सुरू झालाय. काही हिंदू संघटनांचा दावा आहे की, बंगळुरूमधील एक शाळा मुलांच्या पालकांकडून आपल्या मुलाला बायबलसह शाळेत पाठवण्याचे वचन घेण्यात येत आहे. या घटनेनंतर कर्नाटकात पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे. शाळा प्रशासन गैर-ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही हिंदू संघटना करत आहेत.
हे प्रकरण कर्नाटकातील बेंगळुरू येथील क्लेरेन्स हायस्कूलशी संबंधित आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांकडून धर्मग्रंथ शाळेच्या आवारात मुलांनी बायबल घेऊन येण्यास हरकत नाही, असे हमीपत्र घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या नव्या नियमावलीवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हे कर्नाटक शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी दावा केला आहे की शाळा गैर-ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत आहे. या संघटनेने दावा केला आहे की शाळेत गैर-ख्रिश्चन विद्यार्थी देखील आहेत जे शाळेत शिकत आहेत आणि त्यांना बायबल वाचण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, शाळा प्रशासनाने आपल्या भूमिकेचा बचाव केला आहे, असे म्हटले आहे की ते बायबल आधारित शिक्षण देतात.
हेही वाचा: UPI सर्व्हर डाउन; ऑनलाईन पेमेंट अडकल्याने ग्राहकांची ट्विटरवर तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या प्रवेशासाठीच्या अर्जावर अनुक्रमांक 11 मध्ये लिहिले आहे "तुम्ही खात्री करता की तुमचा मुलगा त्याच्या स्वतःच्या नैतिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी मॉर्निंग असेंब्ली स्क्रिप्चर क्लास आणि सर्व वर्गात बायबलसह उपस्थित राहील आणि त्यावर आक्षेप घेणार नाही."
महत्त्वाची बाब म्हणजे, अलीकडेच कर्नाटक सरकारने शाळांमध्ये भगवद्गीता आणण्याची योजना जाहीर केली. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते. यापूर्वी 17 मार्च रोजी गुजरात सरकारने इयत्ता 6 ते 12 च्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद गीता समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा: ".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान
Web Title: Bengaluru School On Bible Education To Non Christian Students Triggers Row In Karnataka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..