Nitesh Rane | ".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Nitesh rane challenges shivsena leaders in Sindhudurg to give up their official police security

".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत नितेश राणेंनी आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवाव असं आव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी त्यांना दिलं यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत वैभव नाईक आणि सिंधूदुर्गच्या सर्व शिवसेना नेत्यांना चॅलेज दिलं आहे.

आज नितेश राणे यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, "सेनेचे आमदार वैभव नाईक यांना माहीत असायाल हवे की मला महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत सुरक्षा नाही.. माझ्या सुरक्षेसाठी मला उद्धव ठाकरेंचे पोलिस नकोत.. पण सिंधुदुर्गातील सर्व सेनेचे नेते आपली अधिकृत पोलिस सुरक्षा सोडून का फिरत नाहीत.. है क्या हिम्मत?" असा सवाल त्यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी याआधी, राणेंचं घर पाडणं, सोमय्यावर हल्ला करणं, दरेकर यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवणं हेच कामं सध्या हे सरकार करत असल्याचा आरोप केला होता. केंद्रीय सुरक्षा असताना नेत्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम आहेत, मुंबईत आता गॅंगवॉरला सुरुवात झाली आहे असंही ते म्हणाले.

हेही वाचा: अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायमचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, गृहमंत्री वळसे पाटलांनी काही दिवस लंडनला फिरायला जावे, परत आल्यावर तुम्हाला असे गुन्हे होताना दिसणार नाहीत, सगळी मुंबई मी साफ करतो, नामर्दासारखं ठाकरे सरकार हे सोमय्यांवर हल्ला करत आहे. त्यांचं सरकार अशा पद्धतीने चालत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे. "अगर आप पत्थर की लढाई करेंगे तो हम पत्थर का जवाब पत्थर से देंगे" असा इशाराही त्यांनी दिला होता.

हेही वाचा: मोठी बातमी! राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Web Title: Nitesh Rane Challenges Shivsena Leaders In Sindhudurg To Give Up Their Official Police Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top