Pani Puri Vendor Stabbed to Death for Refusing Free Food
esakal
मोफत पाणीपुरी देण्यावरून झालेल्या वादातून तरुणाने पाणीपुरी विक्रेत्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकातल्या बंगळुरू शहरात ही घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने त्याला मोफत पाणीपुरी देण्याची मागणी केली होती. मात्र दुकानदाराने नकार दिल्याने तरुणाने चाकूने भोसकून त्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.