

Bengaluru Woman Quits 30 Lakh Salary Job to Travel
Esakal
बंगळुरूतील एका आयटी कंपनीत वार्षिक ३० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून तरुणीने तिची फिरण्याची आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं पण स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि शेवटी धाडसी पाऊल उचललं असं तरुणी सांगते. वनाथी एस असं तरुणीचं नाव आहे. तिने तिच्या या निर्णयाबाबत सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला असून तो व्हायरल होत आहे. डेव्हलपर म्हणून १० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यानंतर कार्पोरेटमधली नोकरी सोडणं कठीण होतं असंही तिने म्हटलंय.