

Man dies before treatment after hospitals refuse emergency care
Esakal
बंगळुरूत हृदयविकाराचा झटका आलेल्या पतीला रुग्णालयात नेण्यासाठी पत्नी मदतीची याचना करत होती. मात्र तिला रस्त्यावर कुणीच मदत केली नाही. हात जोडून मदतीचं आवाहन ती करत होती पण तिच्या डोळ्यादेखत पतीचा तडफडत मृत्यू झाला. पहाटे चारच्या सुमारास पतीला रुग्णालयात नेण्यासाठी पत्नीची धडपड सुरू होती. कुणीच मदतीला न आल्यानं पती अनेक मिनिटं रस्त्यावरच तडफडत होता. शेवटी एका टॅक्सी चालकानं तिची मदत केली. त्याला रुग्णालयात नेलं पण उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.