Crime News: बाईक टॅक्सी चालकाचा मित्रासोबत मिळून तरुणीवर बलात्कार; आजारी पडल्याने...

Crime News
Crime Newsesakal

बंगळुरू - बाईक टॅक्सी चालक आणि त्याच्या मित्राने एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. पीडितेने बाहेर जाण्यासाठी दुचाकी टॅक्सी बुक केली होती, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. Crime news in Marathi

Crime News
Video: 'जसं काही भातखळकरांचा हा व्हिडीओ मोदीजी पाहणार', सत्यजीत तांबेंनी पकडली घाई अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने तिच्या एका मित्राच्या घरातून दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी बाईक टॅक्सी कंपनीची टॅक्सी सेवा बुक केली होती. मात्र बाईक टॅक्सी चालकाने वाटेत संधीचा फायदा घेत पीडित मुलीला आपल्या ठिकाणी नेले, तेथे त्याने आपल्या मित्रासह मुलीवर बलात्कार केला. या गुन्ह्यादरम्यान घटनास्थळी एक महिलाही उपस्थित होती,' असेही पीडितेने सांगितले.

Crime News
Raj Thackeray: राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतय का? राज यांचा रोख कोणाकडे...

२६ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेली असता ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. यापैकी एका आरोपीचा जुनी क्रिमिनल रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com