इंजिनिअर महिलेनं ७० फुटाच्या ब्रिजवरुन फेकलं पोटच्या मुलाला

पुलावरुन मुलाला खाली फेकल्यानंतर स्वत: सुद्धा आत्महत्या केली.
 flyover
flyoverfile photo
Updated on

बंगळुरु: इंजिनिअरींगचे (engineering) शिक्षण घेतलेल्या एका ३२ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला पुलावरुन (bridge) खाली फेकून दिले. त्यानंतर तिनेही स्वत:हा उडी मारुन आत्महत्या केली. दक्षिण बंगळुरुतील (south bangluru)तालाघट्टापुरा येथे रविवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. मुलाचे नाव श्रेयस असून त्याचा जागीच मृत्यू झाला. महिलेचे नाव चंदना बी (chandana b) असून तिचा सोमवारी संध्याकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Bengaluru Woman throws son off from bridge jumps to death dmp82)

चंदना पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिने नवऱ्याकडे नोकरीची परवानगी मागितली होती. तिला एका सॉफ्टवेअर कंपनीत संधी सुद्धा मिळाली होती. पण नवऱ्याने तिला नोकरीची परवानगी नाकारली. त्याशिवाय नवऱ्याचे कुटुंबीय हुंड्यासाठी चंदनाचा छळ करत होते. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून तिने रविवारी संध्याकाळी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

 flyover
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६० लाखाला फसवणूक, जुहू पोलिसात तक्रार

चंदनाचे वडिल बीएस वराप्रसाद यांनी मुलीचा नवरा के. चैतन्य कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवली आहे. महिला राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या नाईस रोडवर संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. चंदनाने ७० फूच उंचीवरुन मुलाला खाली फेकलं, त्यानंतर स्वत: उडी मारली. मुलाचा जागीच मृत्यू झाला.

 flyover
चीन बरोबर लष्करी चर्चेआधी भारताने पूर्व सीमेवर तैनात केली 'राफेल' फायटर विमाने

चंदना गंभीर जखमी झाली होती. अखेर सोमवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. चंदनाने BE मधून इंजिनिअरींग केले होते. चैतन्य कुमारशी लग्न होण्याआधी ती इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती, अशी माहिती वडिल बीएस वराप्रसाद यांनी पोलिसांना दिली. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी तिचे चैतन्यकुमार बरोबर लग्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com