चीन बरोबर लष्करी चर्चेआधी भारताने पूर्व सीमेवर तैनात केली 'राफेल' फायटर विमाने

चीन थेट युद्ध लढण्याऐवजी शक्ती प्रदर्शन करुन शत्रूवर मानसिक दबाव टाकण्याची खेळी खेळतो, हा सुद्धा तसाच भाग आहे.
rafale jet.
rafale jet.

नवी दिल्ली: चीनला (china) लागून असलेल्या पूर्व सीमेवर सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या (Sikkim-Bhutan-Tibet tri-junction) एअर बेसवर भारताने आपली अत्याधुनिक राफेल फायटर विमाने (Rafale fighter plane) तैनात केली आहेत. चीन ज्या पद्धतीने, थेट युद्ध लढण्याऐवजी शक्ती प्रदर्शन करुन शत्रूवर मानसिक दबाव टाकण्याची खेळी खेळतो, हा सुद्धा तसाच भाग आहे. शनिवारी भारत आणि चीनमध्ये उच्चस्तरीय लष्करी चर्चा (military talks) होणार आहे. त्याआधी पूर्व सीमेवर राफेलची तैनाती झाली आहे. (India deploys Rafale fighters on eastern front with China dmp82)

पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर राफेलची 'अखनूर स्क्वाड्रन' तैनात राहणार आहे. या स्क्वाड्रनमध्ये घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आठ नवीन बहुउद्देशीय राफेल फायटर विमाने आहेत. ४.५ जनरेशनच्या राफेल फायटर विमानाच्या नुसत्या उड्डाणाने शत्रुला धडकी भरु शकते. "राफेल विमानांमुळे कधीही, कुठेही गरज असेल, तेव्हा वर्चस्व निर्माण करता येऊ शकते. नुसत्या या फायटर विमानांच्या उपस्थितीने शत्रुच्या मनात भीती निर्माण होईल" असे एअर फोर्स प्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी सांगितले.

rafale jet.
आज मुंबईतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय होणार?

राफेलची पहिली स्क्वाड्रन 'गोल्डन अ‍ॅरो' अंबाला एअर बेसवर पूर्णपणे कार्यान्वित झालेली आहे. या स्क्वाड्रनमध्ये १८ फायटर विमाने आहेत. पूर्व लडाख सीमेवर नेहमी या स्क्वाड्रनचा सराव सुरु असतो. अजूनही या भागात चीन बरोबर सुरु असलेला सीमावाद मिटलेला नाही. पूर्व सीमेवर तेजपूर, चाबुआ बेसवर रशियन बनावटीची सुखोई-३० MKI विमाने आधीपासूनच तैनात आहेत. आता त्यांच्याजोडीला राफेल दाखल झाले आहे. त्यामुळे चीन विरोधात भारताची हवाई शक्ती अधिक मजबूत झाली आहे.

rafale jet.
फोन टॅपिंग हे राज्य सरकारच्या परवानगीनेच, रश्मी शुक्लांचा कोर्टात खळबळजनक दावा

इंडियन एअर फोर्सच्या तुलनेत चीनकडे असलेल्या फायटर विमानांची संख्या जास्त आहे. मागच्यावर्षी लडाख सीमावादाला सुरुवात झाल्यापासून, त्यांनी भारतीय सीमेपासून जवळ असलेल्या होतान, काशगर, गर्गउनसा या एअर बेसवर अनेक सुधारणा केल्या आहेत. युद्ध प्रसंगात चीन (china) आणि पाकिस्तानवर (pakistan) अचूक प्रहार करण्यासाठी निर्णायक ठरणारी ३५ राफेल फायटर विमाने (Rafale fighter jet) २०२१ अखेरपर्यंत फ्रान्स भारताला देणार आहे. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यानुसार, वर्षअखेरपर्यंत भारताला ३५ राफेल मिळतील. उर्वरित एक विमान जानेवारी २०२२ मध्ये वायुदलात दाखल होईल. फ्रान्सने आतापर्यंत २६ राफेल विमाने भारताकडे सुपूर्द केली आहेत. त्यात २४ राफेल भारतामध्ये आहेत. उर्वरित दोन विमाने IAF चे वैमानिक आणि तंत्रज्ञानाना प्रशिक्षण देता यावे, यासाठी फ्रान्समध्ये ठेवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com