इंजिनिअरींगची नोकरी सोडून प्रियकरासोबत करत होती गांजाचा बिझनेस

अखेर एक दिवस....
इंजिनिअरींगची नोकरी सोडून प्रियकरासोबत करत होती गांजाचा बिझनेस

बंगळुरु: कर्नाटकातील बंगळुरुच्या (Bengaluru) सदाशिवनगरमधून ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली एका २५ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अटकेत असलेली तरुणी इंजिनिअर असून ती चेन्नईमध्ये नोकरीला होती. कष्ट न करता सहजतेने पैसे मिळवायचे म्हणून तिने इंजिनिअरींगची (engineering job) चांगली नोकरी सोडली व प्रियकरासोबत गांजाचा व्यवसाय सुरु केला. आरोपींची ओळख पटवण्यात आली असून रेणुका आणि सुधांशू सिंह अशी आरोपींची नावे आहेत. (Bengaluru Woman who quit her engineering job to join lovers ganja business arrested)

आरोपी तरुणीचा प्रियकर सिद्धार्थ हा मुख्य सूत्रधार असून त्याने बंगळुरुच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. सध्या तो फरार आहे. सिद्धार्थ आणि रेणुकाची कॉलेजमध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दरम्यान सिद्धार्थने ड्रग्जची तस्करी सुरु केली. रेणुका खासगी कंपनीत नोकरीला लागली. कंपनीत काम करुन मिळणाऱ्या वेतनावर रेणुका आनंदी नव्हती. तिला जास्त पैसे हवे होते.

इंजिनिअरींगची नोकरी सोडून प्रियकरासोबत करत होती गांजाचा बिझनेस
भन्नाट योगायोग! एका चहामुळे पोलिसांना सापडली बेपत्ता मुलगी

सिद्धार्थने तिला गांजाच्या व्यवसायात साथ देण्यासाठी तयार केले. तुला पुरेसे पैसे मिळतील, असे त्याने तिला पटवून दिले. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तिने माराथाहाळीच्या हॉटेलमध्ये रुम बुक केली. प्रियकर सिद्धार्थ आणि त्याचा साथीदार गोपाळने ओदिशावरुन गांजा तिच्यापर्यंत पोहोचवला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने गांजाला भरपूर मागणी आहे, हे सिद्धार्थला माहित होते.

इंजिनिअरींगची नोकरी सोडून प्रियकरासोबत करत होती गांजाचा बिझनेस
Lockdown Effect: मुंबईत फेरीवाला बनला ड्रग्ज तस्कर

शहरात गांजाचा तुटवडा होता. त्यावेळी त्याने सुधांशूला रेणुकासोबत मिळून गांजा विक्री करण्यास सांगितले. त्यातून भरपूर पैसा मिळत होता. पोलिसांना शहरातील आयटीआय पार्कजवळ गांजा विक्री होणार असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून रेणुकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्याकडून १० पाकिटातून ५,२०० ग्रॅम गांजा आणि ६५०० रुपये कॅश जप्त केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. सिद्धार्थ आणि गोपाळला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com