काँग्रेसची भीती जाईना; काही आमदारांना कोडागूमध्ये हलविणार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

बंगळूर: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील आपले काही आमदार भाजपच्या गळाला लागण्याची भीती असल्याने काँग्रेसने आपले 44 आमदार थेट बंगळूरजवळील एका रिसॉर्टवर नेऊन ठेवले असले तरी, त्यांची भाजपबाबतची भीती कमी झालेली नाही. म्हणूनच, या 44 आमदारांपैकी भाजपच्या गोटात जाऊ शकणाऱ्या काही आमदारांना कोडागू जिल्ह्यात हलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे काही नेते काही काळापासून काही काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत. या आमदारांना गुजरातपासून दूर बंगळूरजवळील रिसॉर्टवर आणल्यानंतरही काँग्रेसला स्वस्थता मिळालेली नाही. भाजपचे नेते बंगळूरातही येऊन डेरेदाखल झाल्याने काही "तरल मनाच्या' आमदारांना बंगळूरपासून दूर थंड हवेच्या कोडागू जिल्ह्यात वीरजपेट येथे नेणार असल्याचे ठरत आहे. भाजपचे नेते पुन्हा एकदा काँग्रेस आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याच्या भीतीने ही हालचाल केली जाणार आहे. काँग्रेसच्या या आमदारांच्या "सुरक्षेची' जबाबदारी कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे आहे.

शिवकुमार हेदेखील काँग्रेस आमदारांबरोबरच राहात असून, त्यांनी दोन गटामध्ये विभागणी करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. गुजरातमध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काही पक्षनिष्ठांना कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ या जैन तीर्थक्षेत्री पर्यटनासाठी नेण्याचाही काँग्रेस नेत्यांचा विचार आहे. 8 ऑगस्टला राज्यसभेसाठी निवडणूक होत असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे गुजरातमधून निवडणूक लढविणार आहेत.

Web Title: benglore news congress mla and gujrat election