बेरोजगारांना मिळणार ३५००? ; पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेमागील सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money

बेरोजगारांना दरमहा मिळणार ३५०० रुपये?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक, नोकरीचं खोट आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळणे अशी अनेक प्रकरणं सध्या घडत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेची एक लिंक व्हायरल होत आहे. मात्र, ही लिंक (link) खोटी असून व्हायरल होत असलेला मेसेजदेखील फेक असल्याचं सांगण्यात आलं आहे. याविषयी 'सायबर दोस्त' या ट्विटर पेजवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (beware link of unemployed allowance scheme spreading rapidly in social media)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेची माहिती देण्यात आली असून सोबतच प्री -रजिस्ट्रेशनदेखील करण्यात येत आहे. इतकंच नाही तर या योजनेअंतर्गत येणाऱ्या बेरोजगार तरुणांना दरमहा ३५०० रुपये मिळतील असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक जण ही लिंक ओपन करत आहेत. मात्र, ही लिंक व मेसेज खोटा असून अशा अफवांना बळी पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: स्मार्ट डॉग! अंघोळ टाळण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

हेही वाचा: White Fungus: म्युकोरमायकोसिसनंतर आणखी एक नवा आजार

दरम्यान, या योजनेअंतर्गत १० वी पास असलेल्या १८ ते ४० वयोगटातील व्यक्तीच रजिस्ट्रेशन करु शकतात असं सांगण्यात आलं आहे. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ मे ही अंतिम तारीख असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

loading image
go to top