
भागलपूर जिल्ह्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.
रब ने बना दी जोड़ी! 36 इंची मुन्नाचं 34 इंची ममताशी झालं लग्न
Unique Marriage In Bhagalpur : भागलपूर जिल्ह्यात (Bhagalpur District) एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला निमंत्रण न देताही हजारो लोकांनी हजेरी लावली. या शानदार सोहळ्यादरम्यान नववधू-वरांसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली होती. वरमाला सोहळ्यादरम्यान लोकांचा स्टेजपर्यंत पोहोचण्याचा सिलसिला असा सुरू झाला की, थांबायचं नावच घेत नव्हता. खरं तर हे लग्न अनोखं ठरलंय. कारण, 36 इंची मुन्नाला त्याची जीवनसाथी मिळालीय.
असं म्हणतात की, लग्नगाठ वरूनच जुळून येते हे खरं आहे. आजपर्यंत आपण अनेक विवाहसोहळे पाहिले असतील आणि त्यात सहभागी झालेच असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या लग्नाबद्दल सांगत आहोत, ज्याच्या वधू-वरांची सर्वत्र चर्चा होत असून या विवाह सोहळ्याला पाहुण्यांची गर्दी झालीय. काही तर त्यात आमंत्रित देखील केलेले नाही, असे पाहुणे होते. त्यांनी वधू-वरांसोबत सेल्फी काढली.
हेही वाचा: चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून माहिती समोर
भागलपूर नवगचिया परिसरातील अभिया गावात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नात वराचे वय 36 इंच तर वधूचे वय 34 इंच होते. विवाह सोहळ्यात न बोलावलेल्या पाहुण्यांची गर्दी होती. कारण, सर्वांनाच वधू-वरांना बघायचं होतं. उपस्थिती गर्दीतून दोघांनीही एकमेकांना पुष्पहार घातला आणि लग्नाचे इतर विधी पूर्ण केले आणि जन्मोजन्मासाठी एकमेकांचे झाले. किशोरी मंडळ उर्फ गुजो मंडळाची मुलगी ममता कुमारी 24 वर्षांची आहे. आणि मसारू येथील बिंदेश्वरी मंडळाचा मुलगा मुन्ना भारती वय 26 वर्षांचा आहे. वधू आणि वर दोघंही भागलपूर जिल्ह्यातील आहेत. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरुय.
Web Title: Bhagalpur Unique Marriage In Bhagalpur 36 Inch Munna Got Life Partner Married With 34 Inch Mamta
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..