हरियाना व उत्तर प्रदेशातही भगवद्‍गीता अभ्यासक्रमात?

सत्ताधारी अनेक खासदारांचा प्रस्तावाला पाठिंबा
Bhagavad Gita syllabus also in Haryana and Uttar Pradesh
Bhagavad Gita syllabus also in Haryana and Uttar Pradesh sakal

नवी दिल्ली : हरियाना आणि उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांत शाळांच्या पाठ्यक्रमांमध्ये भगवद्‍गीतेचा समावेश करण्याचा प्रयोग, या ना त्या स्वरूपात राबविण्यात येण्याची शक्यता आहे. गुजरातमधील सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्‍गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भगवद्‍गीतेच्या प्रयोगाला आता मोदी सरकारमधील अनेक मंत्री आणि खासदार उघड पाठिंबा देत आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रत्येक राज्यात शाळांमध्ये भगवद्‍गीता शिकवण्याचा उपक्रम राबवावा असे जाहीर मत नुकतेच व्यक्त केले.

जोशी म्हणाले, ‘‘भगवद्‍गीता आम्हाला नैतिकतेचा उपदेश करते. समाजाप्रती आपली जबाबदारी काय आहे, याची जाणीव करून देते. त्यामुळे गुजरातचा प्रयोग देशाच्या सर्व राज्यांमध्ये राबविला जाण्याची गरज आहे. भगवद्‍गीतेमध्ये अशा अनेक नैतिक कथा आहेत ज्या माणसाला जगण्याची प्रेरणा देतात.’’

याआधीही प्रयोग

भगवद्‍गीतेचा हा प्रयोग हरियानासारख्या राज्याने यापूर्वीही वेगळ्या स्वरुपात राबविला होता. तेथील मनोहरलाल खट्टर सरकारने दिल्लीत भगवद्‍गीतेवर भव्य कार्यक्रम घेतला होता. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आधारित चित्रकला, श्लोक, निबंध, प्रश्नमंजूषा, नाटक आदींच्या स्पर्धाही भाजपशासित काही राज्यांमध्ये घेण्यात आल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात शिक्षणमंत्री मुरलीमनोहर जोशी यांनीही भगवद्‍गीतेचा प्रसार करण्याची यासारखीच कल्पना मांडली होती. मात्र त्या सरकारमधूनच घटक पक्षांचा प्रखर विरोध झाल्याने भाजपला सोडून ती द्यावी लागली होती.

भगवद्‍गीतेचे पठाण शाळांमध्ये करणे ही चांगली गोष्ट आहे. भगवद्‍गीतेला धर्माशी न जोडता ते एक जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे,यादृष्टीने पाहिले तर वाद निर्माण होणार नाहीत.

- प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com