भगवंत मान बुधवारी एकटेच घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; येथे होणार सोहळा

Bhagwant Mann
Bhagwant MannBhagwant Mann

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय संपादन केला. दिल्लीबाहेर त्यांचे सरकार स्थापन होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान (Bhagwant Mann) हे बुधवारी (ता. १६) शपथ घेणार असल्याचे रविवारी आपने सांगितले. हा शपथविधी सोहळा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे होणार आहे.

विशेष आणि ऐतिहासिक ठिकाणी शपथविधी होत असल्याने केवळ भगवंत मान हेच ​​शपथ (will take oath) घेणार असल्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. यावेळी मंत्रिमंडळातील १६ मंत्री शपथ घेतील. मान (Bhagwant Mann) यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

Bhagwant Mann
पती-पत्नीच्या भांडणात गेला चिमुकलीचा जीव; बापाने जिवंत पुरले

रविवारी आपचे (Aap) सुप्रीमो अरविंद केजरीवाल अमृतसरच्या एका दिवसाच्या भेटीवर आले. जिथे त्यांनी पंजाबमध्ये पक्षाला दोन तृतीयांश बहुमत दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी रोड शोमध्ये भाग घेतला. मान (Bhagwant Mann) आणि केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रविवारी जालियनवाला बागला भेट दिली आणि अमृतसरमधील रोड शोच्या आधी स्मारकावर पुष्पांजली वाहिली.

स्मारकाला जाण्यापूर्वी आपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान यांना मंत्रिपदाचा सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य दिल्याच्या वृत्तामुळे मंत्रिमंडळाच्या संभाव्य स्थापनेबाबत अटकळ वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com