

CM Bhagwant Mann
Esakal
Chief Minister Airport Controversy: दिल्ली विमानतळावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना तपासणीच्या नावाखाली ३ तास रोखून ठेवण्यात आलं आणि ५० हजार रुपयांचा दंडही केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. मात्र कोणत्या कारणासाठी ५० हजार दंड केला हे सांगितलेलं नाही. भगवंत मान हे पॅरिसहून दिल्लीला परतले होते. पॅरिसमध्ये १७ ते २१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित SIAL Paris 2026 या आंतरराष्ट्रीय खाद्य प्रदर्शनात पंजाबच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ते गेले होते. पंजाब सरकारच्या शिष्टमंडळाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. या दौऱ्यासाठी केंद्राने सुरुवातीला राजकीय परवानगी नाकारली होती. त्यानंतर पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने मान यांना फ्रान्सला जाण्याची परवानगी दिली.