'आम' आदमीचा 'खास' शपथविधी; दोन कोटींचा खर्च, जय्यत तयारी

सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
Bhagwant Mann 'Dhuri Assembly constituency'
Bhagwant Mann 'Dhuri Assembly constituency'Team eSakal

पंजामध्ये तब्बल ९२ जागा मिळवत 'आप'ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान हे शपथ घेणार आहेत. शनिवारी त्यांनी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची राजभवनात भेट घेऊन ९२ नवनिर्वाचित आमदारांचे समर्थन पत्र सादर केरत सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिली. त्यानंतर आता 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता शहीद-ए-आझम भगतसिंग यांचं मूळ गाव खटकर कलान येथे त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जोरदार तयारी केली आहे.

Bhagwant Mann 'Dhuri Assembly constituency'
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; झाडल्या गोळ्या

पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासक शपथविधी सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. सोहळ्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मान यांनी अनेक दिग्गज्जांना निमंत्रण दिलं असून, या कार्यक्रमासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

Bhagwant Mann 'Dhuri Assembly constituency'
लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या अनुपस्थितीची घेतली गंभीर दखल

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शपथविधीदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विशेष चौक्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच सीआयडी आणि इतर गुप्तचर यंत्रणांची देखील या सोहळ्यावर पूर्ण नजर असणार आहे. भगवंत मान यांनी याआधीच पंजाबच्या जनतेला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com