

Bhagwant Mann Video Case Forensic Report Controversy
esakal
Bhagwant Mann Latest News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी संबंधित कथित वादग्रस्त व्हिडिओप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी कथितरीत्या फॉरेन्सिक अहवाल तयार करण्याच्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घडामोडीनंतर पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी मुख्यमंत्री मान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.