esakal | Modi Cabinet : भागवत कराडांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

dr-bhagwat-karad

Modi Cabinet : भागवत कराडांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भाजपचे मराठवाड्यातील राज्यसभा सदस्य डाॅ.भागवत कराड Bhagwat Karad take oath as minister यांनी आज बुधवारी (ता.सात) केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी हिंदीतून राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातून प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण मंगळवारी (ता.सहा) अचानक डाॅ.कराड यांच्या नावाची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. याबाबत सकाळने प्रथम वृत्त दिले होते. ते आज खरे ठरले आहे. bhagwat karad take oath as minister in modi cabinet 2021

हेही वाचा: नारायण राणे भाजपला एक नंबरचा पक्ष करतील; नितेश राणे

ओबीसी समीकरण

महाराष्ट्रात Maharashtra ओबीसींचे राजकीय आरक्षण Obc Political Reservation रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजात केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समाजाचा रोष आपल्यावर व्यक्त होऊ नये. या दृष्टीने ओबीसी समाजातून Obc Community मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्याचा विचार केंद्रीय कार्यकारिणीतर्फे करण्यात आला. खासदार भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करत ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्नही भाजपतर्फे BJP करण्यात आला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी चेहरा मिळाल्याने राज्यात आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. त्याच दृष्टीने खासदार भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

loading image
go to top