गुजरातमध्ये लाऊडस्पीकरवर भजन करणाऱ्याची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loudspeaker

गुजरातमध्ये लाऊडस्पीकरवर भजन करणाऱ्याची हत्या

मुंबई : loudspeakerवर भजन म्हटले म्हणून गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात एका ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समुदायातील व्यक्तींनी हत्या केली. गुजरातमध्ये गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा मंदिरावर लाऊडस्पीकर लावण्याच्या कारणावरून हत्या झाली आहे.

हेही वाचा: अंधेरीत घरावर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण

मेहसाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव जशवंतजी ठाकोर असे आहे. ते एक मजूर होते. त्यांचे मोठे भाऊ अजित यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सादाजी ठाकोर, विष्णुजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतजी ठाकोर, जवांजी ठाकोर और विनुजी ठाकोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: मशिदीत लाऊडस्पीकर वापरणे मूलभूत अधिकार नाही : High Court

लक्ष्मीपारा गावात राहणारे अजित यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. जसवंत हे त्यांच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती करत होते. तेव्हा सादाजी यांनी लाऊडस्पीकर का लावला आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर वाद वाढत गेला.

Web Title: Bhajan On Loudspeaker People Thrashed Their Lives

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gujarat
go to top