भारत बायोटेकनं जाहीर केली 'कोव्हॅक्सिन'ची किंमत; सीरमच्या लसीपेक्षा आहे दुप्पट दर

१ मे पासून सुरु होणार तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण
Covaxin
Covaxin

नवी दिल्ली : सीरमने आपल्या कोविशिल्ड लसीची किंमत नुकतीच जाहीर केली. त्यानंतर आता भारत बायोटेकने आपल्या कोव्हॅक्सिन लसीची किंमतही जाहीर केली आहे. मात्र, भारत बायोटेकची ही लस सीरमच्या लसीपेक्षा दुप्पट किंमतीत उपलब्ध असणार आहे. सीरमच्या लसीच्या किंमतीवरुन देशाच टिका-टिपण्णी सुरु असताना भारत बायोटेकच्या या घोषणेनंतर हा विषयही चर्चेत राहणार आहे.

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, देशात लस निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीने आपल्या लसीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. येत्या १ मे पासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होत असून यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध होणार आहे.

कोव्हॅक्सिनची किती असणार किंमत

दरम्यान, भारत बायोटेकनं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, कोव्हॅक्सिनची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये, राज्यांसाठी ६०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये प्रतिडोस इतकी असेल. तर परदेशात ती १५ ते २० डॉलर प्रतिडोस इतक्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड लसीच्या तुलनेत ही किंमत दुप्पट आहे. कारण कोविशिल्ड राज्यांसाठी ४०० रुपयांत तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपयांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com