Bharat Jodo Yatra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राहुल गांधीसोबत…; फोटो शेअर करत म्हणाला… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat jodo yatra stand up comedian kunal kamra join rahul gandhi in rajasthan tweeted photo

Bharat Jodo Yatra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राहुल गांधीसोबत...; फोटो शेअर करत म्हणाला…

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमधून जात आहे. बुधवारी (14 डिसेंबर) या यात्रेत प्रसिध्द स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा देखील सहभागी झाला. त्याने राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसची ही पदयात्रा राजस्थानमध्ये 17 दिवसांत सुमारे 500 किलोमीटरचे अंतर पार करेल. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला आहे.

कुणाल कामराने यात्रेत सहभाग घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्वीट केला आहे. सोबत तो म्हणतो की, भारत जोडो यात्रेत एक आठवडा घालवल्यानंतर मला वाटते की लोक यात्रेपासून दूर राहून तटस्थ राहण्याचा प्रयत्न करातायत. तुम्ही कुंपनावर थांबले आहात ते तटस्थतेमुळे नाही तर भीतीमुळे. सत्तेच्या विरोधात उभे राहणे देखील लोकशाही आहे, जसे ते 2014 पूर्वी असायचे, असे कुणाल कामराने म्हटले आहे.

हेही वाचा: Maharashtra-Karnataka Issue : महाराष्ट्र -कर्नाटक वाद का चिघळला? ट्विटर ठरलं खलनायक

कॉमेडीयन कुणाल कामरा आणि राहुल गांधी यांचा फोटो शेअर करताना काँग्रेस पक्षाने लिहिले की, "या गर्दीत भारत आहे, आम्ही एकत्र चालत राहू, आम्ही एकतेचा झेंडा फडकावू." बुधवारी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे देखील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी सवाई माधोपूर येथील भदौती येथून हा प्रवास सुरू झाला.

आरबीआयचे माजी गव्हर्नरही झाले सामील

या टप्प्यात रघुराम राजन राहुल गांधींसोबत चालले आहेत. दोघेही या यात्रेत सोबत चालताना तसेच चर्चा करताना दिसून आले होते. दोघांचा फोटो शेअर करत काँग्रेस पक्षाने ट्विट केले की, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत फिरताना, द्वेषाच्या विरोधात देशाला संघटित करण्यासाठी उभे राहिलेल्या लोकांची वाढती संख्या हे दर्शवते की आम्ही यशस्वी होऊ.

हेही वाचा: Viral Video : समृध्दी महामार्गावर आता स्टंटबाजीही सुरू; चक्क शॉटगन घेऊन पोहचला तरूण

आरबीआयचे माजी गव्हर्नरही चालले..

या टप्प्यात रघुराम राजन राहुल गांधींसोबत गेले. दोघेही फिरताना चर्चा करताना दिसले. दोघांचा फोटो शेअर करत काँग्रेस पक्षाने ट्विट केले की, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत फिरताना, द्वेषाच्या विरोधात देशाला संघटित करण्यासाठी उभे राहिलेल्या लोकांची वाढती संख्या हे दर्शवते की आम्ही यशस्वी होऊ.

जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शुक्रवारी 100 दिवस पूर्ण होत असून त्यानिमित्ताने राज्याची राजधानी जयपूरमध्ये 'भारत जोडो कॉन्सर्ट' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राजस्थाननंतर ही यात्रा हरियाणात दाखल होणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेची सांगता होईल.

टॅग्स :Rahul Gandhikunal kamra