भारतरत्न हा ब्राह्मणांचा क्लबः असदुद्दीन ओवेसी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना मोदी सरकारने जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांवर ओवेसी यांनी टीका केली. ओवेसी म्हणाले, 'भारतरत्न हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही. दीन दयाळ उपाध्याय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. इतिहासवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास भारतरत्न म्हणजे केवळ सवर्णांचा क्लब असल्याचे तुमच्या लक्षात येईल.'

'सरकारच्या चुकांमुळे काश्मीरमधील समस्या आणखी गंभीर झाली आहे. मोदी काश्मीरमध्ये जातात. दल लेकची सफर करतात आणि बाजूला कोणीही नसताना हात दाखवत फिरतात. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज दक्षिण आशियात भारत एकाकी पडला आहे. या देशाला चौकीदाराची गरज नाही. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ घटनेच्या विरुद्ध काम करत आहे,' अशी टीकाही ओवेसी यांनी केली.

दरम्यान, मोदी सरकारने भारतरत्न जाहिर केल्यानंतर ओवेसी यांनी टीका करताना किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Web Title: Bharat Ratna a Brahmin club says Asaduddin Owaisi