अंधश्रद्धेमुळेच भाटिया कुटुंबाचा बळी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

बुराडी भागातील अकरा जणांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, या सामूहिक आत्महत्याप्रकरणाचा सूत्रधार त्याच कुटुंबातील ललित भाटिया हाच असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या कुटुंबाने हे अघोरी पाऊल उचलल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. तत्पूर्वी रविवारी भाटिया कुटुंबातील दहा सदस्यांनी गळपास लावून आत्महत्या केली होती, तर याच कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध महिला असणाऱ्या नारायण देवी (वय 77) अन्य दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.

नवी दिल्ली : येथे बुराडी भागातील अकरा जणांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, या सामूहिक आत्महत्याप्रकरणाचा सूत्रधार त्याच कुटुंबातील ललित भाटिया हाच असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या कुटुंबाने हे अघोरी पाऊल उचलल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. तत्पूर्वी रविवारी भाटिया कुटुंबातील दहा सदस्यांनी गळपास लावून आत्महत्या केली होती, तर याच कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध महिला असणाऱ्या नारायण देवी (वय 77) अन्य दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. 

ललित भाटिया (वय 45) यांची डायरी पोलिसांच्या हाती लागली असून, यामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. ललित हे मालमत्ता, उद्योग आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आदींबाबत त्यांच्या वडिलांकडून सल्ला घेत होते. त्यांना सर्व कर्मकांडे करण्याचे आदेश वरून दिले जात होते. ललितनेच संपूर्ण भाटिया कुटुंबाला अंधश्रद्धेपोटी आत्महत्या करायला भाग पाडले असावे, या संशयालाही पुष्टी मिळाली आहे. 

या घटनेतील सर्व मृतांची ओळख पटली असून, नारायण देवी (वय 77) आणि त्यांची दोन मुले भावनेश (वय 50) आणि ललित (वय 45), सून सविता (वय 48) आणि टीना (वय 42) , मुलगी प्रतिभा (वय 57), नातवंडे प्रियांका (वय 33), नीतू (25) मोनू (23), ध्रुव (15) आणि शिवम (15) या सर्वांचा त्यात समावेश आहे 
 
संशयास्पद नोंदी 

ललित भाटिया 2015 पासून डायरी लिहित असत, त्यांनी तब्बल 50 पाने लिहिली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी लिखाण करण्यात आले, त्या दिवशीच्या तारखांचाही स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आला आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यापासून ललित यांच्या लिखाणाचे प्रमाण वाढले होते. या डायरीमध्ये शेवटची नोंदही 25 जूनची आहे, असेही तपासातून स्पष्ट झाले आहे. 

वटतपस्येचा उल्लेख 
ललित यांच्या नोंदीमध्ये वट तपस्येचाही उल्लेख दिसून येतो, वडाच्या झाडाच्या प्रतिकृतीची कल्पना करून भाटिया कुटुंबीयांनी त्याचप्रमाणे गळपास लावून घेतला. मृत वडील आपल्याला वाचवतील असा विश्‍वास या सर्वांना होता. या सर्व कुटुंबीयांना आत्महत्या करायची नव्हती, असेही दिसून येते. आत्महत्येपूर्वी या सर्वांनी शनिवारी अनुष्ठानही केले होते. 

Web Title: bhatiya family dead Due to superstition